Ad will apear here
Next
जपान - आत्मकेंद्री ते आत्मनिर्भर (भाग २)
तोकुगावा लेयासु

या सदराच्या मागच्या भागात आपण पाहिले, की युरोपियन लोकांचे कारनामे बघून जपानमध्ये तोकुगावांनी उठाव करून प्रस्थापित शोगनला हटवले व लेयासु तोकुगावा ‘शोगन’ म्हणजेच जपानचा पेशवा बनला. आपल्या हातात सत्ता येताच ह्या तोकुगावाने जपानमध्ये शिरलेल्या पोर्तुगीज ख्रिश्चन पाद्र्यांची अक्षरशः कत्तल केली. जे लोक पुन्हा बौद्ध अथवा शिन्तो धर्मात यायला तयार झाले, त्यांना परत घेतले. काही जपानी लोक ख्रिश्चन धर्मांतरित झाले होते व त्यांनी ह्या तोकुगावाच्या विरोधात छोटे-मोठे उठाव केले. त्यांनाही यमसदनी पाठवले गेले. १६४४पर्यंत जवळजवळ सर्व झेज्युएट पाद्री मारण्यात आले आणि जपान किरस्तावमुक्त झाला. व्यापारासाठी फक्त नागासाकी बंदर हे चीन, डच इस्ट इंडिया कंपनी व थोड्या प्रमाणात ब्रिटिशांना खुले ठेवण्यात आले. व्यापार सोडून जरा जरी धर्मप्रसार करण्याचा प्रयत्न झाला, तर सरळ गर्दन मारली जाई. 

सेनगागुची मंदिर

१६०३ ते १८६८ ह्या वर्षात शोगनपद हे तोकुगावा घराण्याकडे वंशपरंपरेने होते. ह्या तोकुगावांनी शिक्षणाकडे योग्य लक्ष दिले. शिनपान प्रांतात एक शैक्षणिक संस्था उभारली. त्यांचे अनुकरण करत प्रत्येक दायम्यूनी आपापल्या प्रदेशात शिक्षण संस्था उभारल्या. जपानच्या मंदिरांनीसुद्धा ‘तेराकोया’ म्हणजेच मंदिरातील शाळा सुरू केल्या. मुलांना लेखन, वाचन, गणित, तसेच मार्शल आर्ट शिकवले जाई. १८६८पर्यंत जपानमध्ये ४० टक्के पुरुष साक्षर होते व १० टक्के महिला साक्षर होत्या. त्या काळात हा साक्षरतेचा दर खूपच चांगला होता. 

तोकुगावांच्या कारकिर्दीत जपानमध्ये जातिव्यवस्था अतिशय ठळक झाली. जशी भारतात चातुर्वर्ण्य पद्धत होती, तसे वर्ण जपानमध्येही होते. ह्या सर्वांत सामुराई म्हणजेच जपानमधली योद्धा जमात सर्वांत उच्च समजली जाई. त्यांच्या खालोखाल शेतकरी, पशुपालन करणारे, त्यांच्या खाली कलाकार व त्यांच्या खाली व्यापारी वर्ग अशी उतरंड होती. सामुराईंना सरकारकडून वेतन दिले जाई. 

तोकुगावांच्या काळात शांतता असल्याने जपानी चित्रकला, वस्त्रोद्योग भरभराटीला आला. ह्याच काळात जपानमध्ये ‘गेशा’ व्यवसाय करणाऱ्या महिला उदयाला आल्या. ‘गेशा’ आणि वेश्या ह्यांच्यात फार फरक आहे. गेशांना करमणूक करणाऱ्या महिला मानले जाते व उच्चभ्रू लोकांमध्ये गेशाकडे जाणे आजही प्रतिष्ठेचे मानले जाते. अर्थात त्या काळात जपान सुखी, शांत अर्थात आपल्यातच रमलेला होता. जपानबाहेर होत असलेल्या घडामोडींची त्याला सुतराम फिकीर नव्हती.
(क्रमशः)

- डॉ. सुजय लेले, रत्नागिरी

(या सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

किमोनो हा गाउनसारखा जपानी पोशाख घातलेली गेशा
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GXVFCO
Similar Posts
जपान - आत्मकेंद्री ते आत्मनिर्भर (भाग १) कोणे एके काळी आत्मकेंद्री असलेल्या जपानने आत्मनिर्भर देश होण्यापर्यंत कशी वाटचाल केली, याची माहिती देणाऱ्या लेखमालेचा हा पहिला भाग...
जपान - आत्मकेंद्री ते आत्मनिर्भर (भाग ३) जपान जरी ‘सुशेगाद’ होता, तरी अमेरिकेत मात्र व्यापाराच्या नवीन-नवीन संधी शोधण्याचे प्रयत्न जोरदार सुरू होते. साऱ्या जगात आपल्या मालाला हक्काचे मार्केट कसे मिळेल हे अमेरिका पाहत होता. त्यामुळेच अमेरिकेची नजर जपानवर गेली. १८४०मध्ये अमेरिकेच्या नौदलाचा एक कमांडर अमेरिकेच्या जहाजांना घेऊन इडोच्या म्हणजेच आत्ताच्या टोकियोच्या आखातात आला
राजधानी आज आर्चिस ‘वॉशिंग्टन डीसी’ला गेली. अमेरिकेतल्या ज्या अनेक गोष्टी आम्हाला मनापासून आवडतात त्यातला हा सर्वांत जास्त आवडता उपक्रम.. अमेरिकेतील जवळ जवळ प्रत्येक सरकारी शाळा आठवीतल्या मुला-मुलींना एक आठवडा राष्ट्राची राजधानी दाखवायला घेऊन जाते... मागे आम्ही जेव्हा कामाच्या निमित्ताने अमेरिकाभर फिरायचो
जपान - आत्मकेंद्री ते आत्मनिर्भर (भाग ४) साकामोतो रोम्या व नाकाओका शिंतारो ह्यांच्या बाजूने सामान्य लोक व काही दायम्यू आले. जपानमध्ये शोगन विरुद्ध नवमतवादी असा संघर्ष सुरू झाला. ह्यात शोगनच्या माणसांनी साकामोतो रोम्या आणि नाकाओका शिंतारोचा खून केला. ते दोघे त्या वेळी जेमतेम तिशीचे होते. ह्या दोघांच्या बलिदानामुळे शोगनविरुद्ध चाललेला लढा अधिक

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language